Wednesday, February 8, 2023

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, उद्या गट आणि गणांची रचना जाहीर होणार; 8 जून पर्यंत हरकती व सूचनांची मुदत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हापरिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना उद्या दिनांक 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या आदेशाच्या मसुदाची प्रत ही जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद याबरोबरच जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव खै, लोहा, कंधार, मुखेड, व देगलूर येथील तहसिलदार कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

आदेशाच्या मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्या संदर्भात सकारण लेखी निवेदने/ हरकती/ सूचना तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे 8 जून 2022 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली निवेदने/हरकती/सूचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,707FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!