ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भोकर ते नांदेड येणाऱ्या भरधाव वेगातील एका ट्रकने बारड येथे आठ दुचाकींना चिरडल्याची घटना मंगळवार दि . ३० एप्रिल रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी भोकरहून नांदेडकडे येत असलेल्या (एमएच३४- बीजी- ७४२३) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा बारड येथे आल्यानंतर ट्रकवरील ताबा सुटला. यात ट्रकने बारड चौकातील जवळपास आठ दुचाकींना चिरडले. या घटनेत गोविंद रामजी कोडेवाड (वय ४०, रा. खरबी, ता. भोकर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना बारड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे व त्यांच्या टीमने तसेच बारड महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्त ट्रकला रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे दुचाकी चालकांची मोठी नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
