Sunday, April 14, 2024

ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक; एकाच कुटुंबातील तीन जण ठार; देगलूर- नरसी महामार्गावरील अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नरसीफाटा (जि. नांदेड)- नरसी-देगलूर राज्य महामार्गावर ट्रक व स्विफ्ट डिझायर कारची समोरासमोर भीषण धडक होऊन कारमधील एकाच कुटुंबातील तीन जण ठार आले आहेत. तर कार चालक व एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडला पाठवण्यात आले आहे. आज दि 3 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कुंचेली फाट्याजवळ हा अपघात झाला.

नरसी-देगलूर राज्य महामार्गावर कुंचेली फाटा किनाळा शिवारात देगलूरकडुन ए.पी.03 टी.ई. 3186 क्रमांकाचा ट्रक नांदेडकडे जात असताना नरसीकडून शंकरनगरकडे जाणारी स्विफ्ट डिझायर एम एच 25 टी 1075 या कारची कुंचेली फाटा, किनाळा शिवारात समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की यात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. कारमधील एकाच कुटुंबातील शंकर गंगाराम जाधव (वय 55 वर्षे, रा. टाकळी तमा, ता.नायगाव), महानंदा शंकर जाधव (वय 50 वर्षे, रा.टाकळी तमा, ता.नायगाव), कल्पना कोंडीबा पाटील (वय 35 वर्षे, रा.केरूर ता. बिलोली) अशी मयतांची नावे आहेत. अपघातात कार चालक धनराज शंकर जाधव (रा. टाकळी तमा, ता.नायगाव) व स्वाती हे गंभीर जखमी झाले आहेत.

रामतीर्थ पोलिसांना अपघाताची ही माहिती कळताच सपोनि विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे पाठवले. तेथे जखमींवर प्रथमोपचार करुन त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. तर मयतांची प्रेतं उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नायगाव येथे पाठवण्यात आले आहे. अपघातात होताच ट्रक चालक पसार झाला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!