Tuesday, November 5, 2024

ट्रक- ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, तीन प्रवासी जागीच ठार; ६ गंभीर जखमींना नांदेडला हलविले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

२४ जण जखमी; कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावरील भीषण अपघात

नांदेड- हिंगोली ते नांदेड मार्गावर पारडी मोड शिवारामध्ये ट्रक व खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून या भीषण अपघातात २४ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज बुधवारी दि.२९ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींना उपचारासाठी कळमनुरी, आखाडा बाळापूर, नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथून एक खाजगी बस (क्र. एम एच 38 एफ 8485) प्रवासी घेऊन हिंगोलीकडे निघाली होती. यावेळी कळमनुरीकडून आखाडा बाळापुरकडे निघालेल्या कंटेनरची खाजगी बस सोबत समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की खासगी बसच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी चालकाच्या समोरील काच फुटून बाहेर फेकले गेले. या अपघातामध्ये तिघे जण ठार झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी, अत्यवस्थ असल्याने मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसासह, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे यांच्यासह कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी एकत्र आले. पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चार रुग्णवाहिकाद्वारे अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी, आखाडा बाळापुर, नांदेड येथील रुग्णालयात पाठविले आहे.

कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली अडकलेले दोन जणांचे मृतदेह जेसीबीद्वारे कंटेनर उचलून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामध्ये तिघे जण ठार झाल्याची माहिती कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलिस सहा उपनिरीक्षक रोयलावार यांनी दिली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती अपघाताची भीषणता दर्शवित आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!