Friday, July 19, 2024

डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केले; चोरट्यांचे कृत्य की घातपात? अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हत्येचे गुढ कायम

अर्धापूर ( जि. नांदेड)- जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत सुरू असतानाच हदगाव तालुक्यातील चाभरा येथे खुनाची घटना घडली आहे. वसरीत झोपलेल्या एकावर कुऱ्हाडीचा घाव घालून ठार करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार दि.9 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमीला शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथे दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा हल्ला चोरट्याने केला की इतर कुणी घातपात केला याबाबत विविध तर्क लावले जात असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील बालाजी दिगंबर काकडे ( वय ३५) हे आपल्या घरी नेहमीप्रमाणे घरासमोरील वसरीत (पत्र्याचे शेड असलेल्या ठिकाणी) झोपले असता रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बालाजी काकडे झोपेत असतांना त्यांच्यावर हल्ला केला. मानेखाली डोक्याजवळ, उजव्या डोळ्याच्या बाजूस असे पाच ते सहा कुऱ्हाडीचे घाव त्यांच्यावर घालण्यात आले. या हल्ल्यात  बालाजी हे गंभीर जखमी झाले असता त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरात कमाईचे कुठलेही साधन नसून कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले.

हा प्रकार चोरट्यांनी केल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. पण त्याचबरोबर हा घातपाताचा प्रकार असू शकतो अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे. डोक्यात कुऱ्हाड घालून झालेल्या हत्त्येचे गुढ काय ? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!