ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देगलूर नाका परिसरात एका युवकावर भिशीचा हप्ता वेळेत न दिल्यामुळे तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाची दोन बोटे तुटली असून पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना 21 एप्रिलच्या सायंकाळी सहाच्या सुमारास देगलूर नाका भागातील याफाई हॉटेलसमोर घडली.
नांदेड शहराच्या देगलूर नाका भागात राहणारा खलील कुरेशी दस्तगीर कुरेशी हा व्यापारी हॉटेलच्या खाली मोबाईल दुकानावर थांबला होता. यावेळी इरफान लतीफ रा. हिलालनगर हा तेथे आला. खलील कुरेशी याला भिशीचा हप्ता वेळेत का देत नाही असे म्हणून वाद घातला. आणि त्यानंतर इरफान लतीफ याने तलवारीने त्याच्यावर वार केला. परंतु त्याने वार हातावर झेलल्याने डाव्या हाताची दोन बोटे तुटली. पुन्हा उजव्या पायावर जबर वार करून पायाचे हाड फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी खलील कुरेशी यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत. जखमी खलील कुरेशी याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻