Saturday, July 27, 2024

तिन्ही सांजेला सांजवातीने नदी उत्सवाची सांगता

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

त्रिकुट येथे रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रमाचा समारोप

नांदेड- नांदेड पासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले त्रिकुट हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचे गांव. इथला संगमाचा नितांत सुंदर काठ आणि या पात्रातील पाण्यात विसावलेल्या प्राचीन गणपती मंदिरामुळे हे ठिकाण तसे अनेकांच्या श्रद्वेचे आणि भक्तीचे आहे. नुकत्याच सुरु झालेल्या कडाक्याच्या थंडीतही हा काठ वेगळया ऊर्जेची अनुभूती देत आहे. याचे साक्षीदार आहेत पंचक्रोशीतील नागरिक आणि जिल्हा प्रशासनाची टीम.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत आपली गोदावरी आणि आसना नदीच्या त्रिकुट येथील संगमाचा आर्वजून समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने त्रिकुटच्या काठावर स्वच्छतेसह लोकसहभागातून अनेक उपक्रम गत आठ दिवसापासून सुरु आहेत. उपक्रमांची सांगता आज संगमाच्या पात्रात तिन्ही सांजेला सांजवातीने करण्यासाठी असंख्य महिला पुढे सरसावल्या. नदीच्या पावित्र्यासह तिला आमच्या कडून आणखी प्रदूषित होऊ देणार नाही यांची खूणगाठ मनाशी बांधत महिलांसह उपस्थितांनी या सांजवातेसह दिव्यांना संगमाच्या पाण्यात प्रवाही केले. या उपक्रमात नदी स्वच्छतेपासून मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, कोविड लसीकरण, बचतगटाच्या महिलांच्या पुढाकारातून संगमाच्या काठाची स्वच्छता, योगा शिबिर, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम या काठाने अनुभवले.

नदी विषयी जाणीव जागृतीचा आदर्श वस्तूपाठ

-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

रिव्हर्स ऑफ इंडियाच्या निमित्ताने मानवी जीवनातील, पर्यावरण संतुलनातील नदीच्या महत्वासह तीच्या प्रती अधिक जबाबदार वर्तन गावकऱ्यांकडून, नागरिकांकडून व्हावे या उद्देशाने हा विशेष उपाक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. त्रिकुट येथे आबालवृध्दांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी विविध उपक्रमात घेतलेल्या सहभागाने आमचा विश्वास द्विगुणित झाला आहे. यापुढेही आम्ही जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसहभागावर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. महिलांच्या पुढाकारातून ही सांजवात आता प्रवाहित झाली असून अनेक गावे नवा यातून प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांचा उर्त्स्फूत सहभाग हा नदीचा काठ उजळविणारा

–मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत त्रिकुट येथे साजऱ्या झालेल्या या नदी उत्सवात महिलांचा उर्त्स्फूत सहभाग मिळाला आहे. मॅरेथॉन ते सांस्कृतिक कार्यक्रमापासून हेरिटेज वॉक मध्येही मुली व महिलांनी सहभाग घेतला. त्याचा हा सहभाग काठाच्या स्वच्छतेपासून आहे. प्रत्येक गावकऱ्यांनी आपली जबाबदारी नदी प्रती कृतज्ञता व आपले उत्तरदायित्व स्वीकारले तर तीचे प्रदुषण कमी होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसहभागाची वेगळी शक्ती सर्वांनी अनुभवली आहे. माता साहिब गुरुद्वारा व गावकऱ्यांनी जो सहभाग दिला तो महत्वाचा असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. सर्वाची कृतीही एक प्रकारे नदीचे काठ उजळविण्यासारखेच असल्याचे त्या म्हणाल्या.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!