Thursday, June 1, 2023

तीन चोरट्यांनी विद्यार्थ्यास लुटले, जिगरबाज विद्यार्थ्याने एका लुटारुला पकडले; पहाटे 5 वाजता भाग्यनगर मुख्य रस्त्यावर घडलेली घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नीटच्या अभ्यासक्रम तयारीसाठी नांदेडमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यास पहाटे 5 च्या सुमारास तीन चोरट्यांनी लुटल्याची घटना नांदेड शहराच्या भाग्यनगर- कैलास नगर या मुख्य रस्त्यावर घडली आहे. विद्यार्थ्यास तीन जणांनी लुटल्यानंतर या विद्यार्थ्याने यातील एका चोरट्यास जिगरबाजपणे पकडून ठेवले, या चोरट्यास नंतर या भागातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

शहरातील खाजगी कोचिंग कलासेसमध्ये नीटचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा गडचिरोली येतील निदेश दुर्गे हा तरुण आज दि. 8 रोजी सकाळी गडचिरोलीला जाण्यास निघाला. पहाटे 5.30 च्या रेल्वेने जाण्यासाठी तो अशोकनगर- भाग्यनगर मुख्य रस्त्यावर गजानन महाराज मंदिरासमोर पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास वाजता तो ऑटो रिक्षाची वाट पाहत थांबला होता.

थोड्याच वेळात दोन दुचाकीवर तिघेजण तेथे आले आणि त्यांनी निदेशला कोठे जायचे असे विचारून, आम्ही तुला सोडतो असे सांगितले. त्यासाठी 100 रु घेतो असेही ते म्हणाले. रेल्वे स्टेशनला जाण्यास उशीर होत असल्याने निदेशने त्यास होकार दिला. यातील दोघांनी गाडीवर बसवून रस्त्याशेजारीच कैलासनगर मध्ये नेले आणि त्यांनी दुर्गे यास मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या कडील मोबाइल व 1700 रु नगदी काढून घेतले. त्यानंतर हे तिघे पळ काढत असतानाच या तिघांपैकी एकास निदेश याने पकडुन ठेवले व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारील लोक उठले आणि निदेशच्या मदतीस धावले. नंतर सर्वांनी मिळून लुटारूस पकडून ठेवले.

हा प्रकार तात्काळ भाग्यनगर पोलिसांना कळवण्यात आला, परंतु पोलीस तब्बल एक तास घटनास्थळी पोहचलेच नाहीत. अनेक वेळा फोन व नंतर पोलीस नियंत्रण कक्षाला 2 वेळा फोन केल्यानंतर स्कुटीवर महिला पोलीस व दुसऱ्या स्कुटीवर एक पुरुष पोलीस आला. शेवटी तिघांनी एका स्कुटीवर लुटारूस मध्ये बसवून त्याला पोलीस ठाण्यात नेले.

पकडलेला लुटारू हा अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपार पर्यंत सुरूच होती. या जिगरबाज विद्यार्थ्याने एका लुटारूस पकडून ठेवले खरे! परंतु भाग्यनगर पोलीस ही माहिती कळवूनही एक तासांपर्यंत घटनास्थळी आले नाहीत, या प्रकाराने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,790FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!