ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ अज्ञात आरोपींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अर्धापूर (जि. नांदेड)– तालुक्यातील मालेगाव येथील संदीप चंपतराव इंगोले हे काल शनिवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान रेडचिली ढाबा येथे थांबले असताना ताे़ंडाला दस्ती बांधून स्कुटीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या पाठीवर व छातीवर खंजीर व तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताची पत्नी पूजा संदिप इंगोले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ३०२, २९४, ३४ भादवी आपत्ती २५,४.आर्मअँक्ट प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव येथील रेडचिली ढाबा जवळ संदिप चंपतराव इंगोले हे थांबले होते. यावेळी तोंडाला दस्ती बांधलेले दोघे जण स्कुटीवर तिथे आले. यावेळी एकाच्या हातात तलवार तर दुसऱ्याच्या हातात खंजीर होता. तु आमच्या आई बहिणीवर शिवीगाळ का करतोस असे म्हणत त्यांनी खंजीर व तलवारीने संदीप इंगोले यांच्या पाठीवर तसेच छातीवर सपासप वार केले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी भेट देऊन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनि.साईनाथ सुरवशे, पोउनि कपील आगलावे, पोउनि म.तयब अब्बास, पोउनि कैलास पवार, जमादार संतोष सुर्यवंशी, तुकाराम बोईनवाड, पोलीस नाईक पप्पू चव्हाण, गुरूदास आरेवार, राजेश घुन्नर हे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
