Sunday, October 6, 2024

थरारक लगीनघाई! पुराच्या पाण्यात थर्माकोलवर बसून नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी पोहोचले वधूच्या गावी; तब्बल 7 किलोमीटरचा थरारक प्रवास

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या मोठ्या पुराच्या परिसरातच एक थरारक लगीनघाई दिसून आली आहे. लग्नविधीचे मुहूर्त टळू नये म्हणून पुराच्या पाण्यात थर्माकोलवर बसून नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी वधूच्या गावी पोहोचल्याची घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यासाठी त्यांनी तब्बल 7 किलोमीटरचा थरारक प्रवास केला आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवसापासुन संततधार पाऊस सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील नदी- नाले ओसंडुन वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क देखील तुटलेला आहे. या पुरामुळे अनेक मार्गावरची वाहतुकही देखील  बंद आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील वराचे नियोजीत लग्न आज शुक्रवार दि. १५ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली या गावी आहे. गुरुवारी दि. १४ जूलै रोजी टिळा आणि हळदीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम झाल्यानंतरच लग्न लागू शकणार होते. मग काय! या हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव इतर वऱ्हाडी मंडळींसह थर्माकॉलच्या हुडीवरून सासुरवाडीत पोहचला.  मोठ्या पुराच्या पाण्यातून त्यांनी तब्बल 7 किलोमीटरचा थरारक प्रवास केला.

हदगाव तालुक्यातील करोडी  येथील शहाजी माधव राकडे (वय २१) हा आठवी शिकलेला तरूण आहे. परिवारात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. बहिणींचे लग्न झाले आहेत. घरी शेती वगैरे काही नाही. मोल मजुरी करून कुटूंबाचा चरितार्थ चालतो. त्याचा विवाह नात्यातीलच उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील वधु गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिन्यापुर्वी जुळुन आला होता.

ठरल्या प्रमाणे दि. १४ गुरूवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवाट्याचा आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सततच्या पावसामुळे सर्वत्र पुर परस्थिती असतांना संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधु नदीचे संगम स्थान आहे. त्यामुळे येथिल पुर परिस्थिती भयानक असते. तरीही ठरल्याप्रमाणे नियोजीत वेळी टिळा, कुंकु, पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहचायचच असं ठरवून नवरदेव आणि नातेवाईकांनी ठरवलं. अन नवदेवरदेवाकडील वऱ्हाड नवरदेव शहाजी राकडे सोबत थर्माकॉलच्या हुड्या वरून पैनगंगा नदी मार्गे पुराच्या पाण्यातून ७ कि.मी.चे प्रवास अंतर पार करत संगमचिंचोली येथे पोहचले. यासाठी परतून दोन तास प्रवास करावा लागला. सर्व प्रवास जीवाघेणा असाच होता.

पुराच्या पाण्यातून प्रवास करून सुखरूप पोहचल्यानंतर वराच्या टिळ्याचा आणि  वधुचा कुंकू- पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री हळदीचा कार्यक्रम झाला. टिळा, कुंकवाचा कार्यक्रम उरकुन सोबतचे काही नातेवाईक गावाकड परतले असून आजच्या लग्नाच्या तयारीसाठी कामाला लागले होते. जलमार्गाने पुराच्या पाण्यातुन पैनगंगा नदीतून टिळा हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहचलेल्या नवरदेवाची सध्या चर्चा सर्वत्र सुरू आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!