Tuesday, October 15, 2024

दारूचा खेळ! अपघाताचा बनाव करून दारूची काळ्या बाजारात विक्री; लाखोंचा दारुसाठा जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई; तीन आरोपींना अटक

नांदेड- परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येणारे मद्य, विविध ठिकाणी अपघात दाखवून काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चार ठिकाणी कारवाई करून सुमारे 20 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तीन जणांना अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथील मे. पायोनिअर डिस्ट्रीलरी (आसवणी) येथून उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठविण्यात आला होता. तत्पूर्वी त्या वाहनाचा तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलिसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत.

ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाच्या पथकाने निरीक्षक ए. एम. पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, स. दु. नि. शिवाजी कोरनुळे, जवान उज्जल सदावर्ते, जवान नि वाहन चालक फाजिल खतिब यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या  कारवाईत दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए. जी. शिंदे, मो. रफी, बालाजी पवार, विकास नामवाड, परमेश्वर नांदुसेकर, आर. बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केली. सदरील गुन्हाचा पुढील तपास .ए.एम. पठाण निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, देगलूर विभाग हे करीत आहेत.

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800833333 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!