Friday, July 19, 2024

दुचाकीवर गावाकडे निघालेल्या दोन तरुणांना होंडा सिटीने उडवले; 50 फूट उडून पडलेले दोन्ही तरुण जागीच ठार, हिमायतनगर तालुक्यातील सरसमजवळील अपघात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिमायतनगर (जिल्हा नांदेड)- दुचाकीवर आपल्या गावाकडे परत निघालेल्या दोन तरुणांना होंडा सिटीने कारने उडवले; यात 50 फूट उडून पडलेले दोन्ही तरुण जागीच ठार झाले आहेत. हिमायतनगर तालुक्यातील सरसमजवळ हा भीषण अपघात झाला.

वाळकेवाडी तालुका हिमायतनगर येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज बुधवार दि. 16 मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिमायतनगर- सरसम रस्त्यावर सरसमजवळ घडली. वाळकेवाडी, तालुका हिमायतनगर येथील गंगाधर माझळकर आणि केरबा हुरदुके हे दोन तरुण दुचाकी क्रमांक (एमएच २६-एएच- ८४६१) वरून गावाकडे जात होते. त्यांची दुचाकी सरसमजवळ येताच नई आबादी परिसरात (एमएच ४४- जी- १८८२) या होंडा सिटी कारने त्यांना उडवले. ही धडक इतकी जोरात होती की अपघातस्थळापासून पन्नास फूट दूर हे दोघेही फेकले गेले. दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हिमायतनगर पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही मृतदेह हिमायतनगरच्या सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर काही वेळ या रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!