Tuesday, May 21, 2024

देगलूर मार्केट कमिटीवर भाजपाचा झेंडा; १७ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा


देगलूर- जिह्यातील महत्वपुर्ण देगलूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीचा रविवारी दुपारी निकाल घोषीत झाला असून शेतकरी विकास पॅनलने सर्वच संचालक पदाच्या जागा जिंकुन भाजपाने येथे आपला झेंडा फडकवला आहे. तर एकाही जागांवर विजय न मिळविता आल्याने महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडाला आहे. नुकत्याच झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणूकी विजय मिळविलेल्या कॉगेसला मार्केट कमिटीत मात्र पराभवाची धुळ चाखावी लागली आहे.


देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी थांबताच गेल्या वर्षानंतर देगलूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला़ हाणेगाव मार्केट कमिटीचे देगलूर माकेट कमिटीत समायोजन झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस यासह इतर अपक्ष उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती़   मार्केट कमिटीच्या  संचालक पदासाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगनात उतरले होते़शनिवारी मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी ८ बुथवर मतदान झाले़ एकुण २०३० मतदारापैकी १ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ यातुन जवळपास ९३ टक्के मतदान झाले होते़ सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण मतदार संघाच्या शांताराम वसंतराव पळटणीकर, अनिकेत उदयकुमार पाटील, अनिलकुमार हणमंतराव पाटील, नरसिंग गोविंदराव पाटील, मारोती गोविंदराव पाटील, रमेश संजीवनराव भालेराव, हसनाबादे देशमुख हणमंत संग्राम हे सात उमेदवार विजयी झाले आहेत.


आडत व्यापारी मतदारसंघातून नारलावर संतोष मधुकर ,मुंडकर गंगाधर मारुतीराव, यांनी विजय मिळविला़ ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण गटांमध्ये पंकज शहाजीराव देशमुख,ग्रामपंचायत अनुसूचीत जाती जमाती मधून राजकुंडल विठ्ठल साधू ,ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकांमधून संगीता नारायण बिरादार रमतापुरकर तर सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघांमधून शेतकरी विकास पॅनलचे पाटील सिमाबाई अशोक राव यांनी व भुताळे पद्मीनबाई यांनी  घेऊन विजय मिळवला़ यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रणीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना यामध्ये पराभव पत्करावा लागला तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नंदकुमार पाटील पळणीटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम पाटील पळणीटकर, राजू देशमुख शिळवणीकर, रमेश राणे पाटील, विवेक सावकार, शिवकांत आप्पा माळगे आदीनी निवडणूकीसाठी परिश्रम घेतले.

काही दिवसापूर्वी झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत पालकमंत्री अशोकराव चव्हास यांच्यामुळे काँग्रेसने विजय मिळविला असलातरी जिल्ह्यात मार्केट कमिटी असलेल्या देगलूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची धुळ चाखावी लागली आहे़ खा़प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली किमया दाखवून देगलूर मार्केट कमिटीवर भाजपचा झेंडा फडकावला आहे़ या विजयाचा भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. देगलूर मार्केट कमिटी निवडणुकीत अनेक दिग्गजांनी आपले उमेदवार रिंगणात उतरून प्रचाराचा धुरळा उडवला होता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!