ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
नांदेड– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील 5 मंत्री, 3 खासदार तसेच अनेक आमदारांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर हे उद्या गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे गुरूवार दि.4 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून त्यांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता गुरुद्वारा मैदान, रेल्वे स्टेशन रोड (हिंगोली गेट), नांदेड येथील मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, खा.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रचार सभा होणार आहे.
या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, आ. राम पाटील रातोळीकर, आ.डॉ.तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. भीमराव केराम, माजी आ. सुभाषराव साबणे, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, प्रदेश सचिव देविदास राठोड, शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, महाराष्ट्र संघटक (आठवले गट) विजय सोनवणे, लोकसभा निवडणूक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रा.काँ.पा.चे प्रदेश सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, हरिहरराव भोसीकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर,उमेशराव मुंडे, गंगाधरराव बडूरे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष (उत्तर) विश्वांभर पवार, जिल्हाध्यक्ष (आठवले गट) गौतम काळे, रा.काँ.चे शहराध्यक्ष जीवनराव घोगरे, प्रविण साले, उमरी कृउबाचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, मारोतराव कवळे आदी नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
जुना मोंढा येथून 10 वाजता रॅली
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 10 वाजता जुना मोंढा येथून, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ,मारवाडी धर्मशाळा, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुरुद्वारा मैदान (हिंगोली गेट) सभास्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी व भाजप महायुतीच्या जाहीरसभेसाठी नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीच्यावतीने करण्यात आली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻