ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर : – शहरातील कै.गणपतराव देशमुख नगर येथील चिमुकला सायंकाळी खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. दोन दिवसांनंतर बेपत्ता असलेल्या या चिमुकल्याचा कॅनॉलमध्ये मृतदेहच सापडला आहे. पोलीस प्रशासनाने व नातेवाईकांनी दोन दिवसांपासून त्याचा कसून शोध घेत होते.
अर्धापूर शहरातील तामसा रोडवरील कै. गणपतराव देशमुख नगर येथील स्वराज संतोष पानपट्टे (वय ७ वर्ष) हा दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला, पण नंतर घरी परतलाच नाही. खूप शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी अर्धापूर पोलीस प्रशासनाला याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता आज दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी बेपत्ता स्वराज मयत अवस्थेत वसमत फाटा महामार्ग चौकीच्या मागे असलेल्या कॅनॉल मध्ये सापडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली.
स्वराज कॅनॉलपर्यंत कसा आणि का गेला? त्याला कोण घेऊन गेले? तो खेळत कॅनॉलपर्यंत गेला का? याचा पोलीस तपास करीत आहेत.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे, पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे यांच्यासह अनेकांनी स्वराजचा मृत देह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी काढण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, पोउनि.सय्यद तय्यब, जमादार राजेश वरणे, मजाज खान, संदिप पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन येवले, मारोती कूकडे, साई काकडे, दिनेश कूकडे, राम गीरी, सुनिल कूकडे, गणेश राऊत, किशोर काकडे, विजय गंधनवाड, माजी सरपंच दादाराव पाटील, बालाजी लंगडे यांच्यासह अनेकांनी स्वराजला शोधण्यासाठी आणि त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻