Sunday, October 6, 2024

धक्कादायक: जिम्नॅस्टिक क्लास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सतत छेडणाऱ्या आणि कपडे चेंज करताना लपून पाहणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकास पोलीस कोठडी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- चंदिगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे खासगी व्हिडिओ लिक केल्याचे प्रकरण आणि मुंबईतील पवई आयआयटीमध्ये महिलांच्या शौचालयात डोकावून पाहण्याचा प्रकार ताजा असतानाच नांदेडमध्येही असा संतापजनक प्रकार समोर आला. जिम्नॅस्टिक क्लासला आलेल्या एका पंधरा वर्षीय युवतीला कपडे चेंज करताना पाहून तिच्याशी लगट करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून त्याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकारामुळे जिम्नॅस्टिक क्लाससाठी मुलींना पाठवणाऱ्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंदिगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे खासगी व्हिडिओ लीक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनीची बदनामीची चर्चा संबंध देशभर झाली. यात जवळपास आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली. हा तपास सुरू असतानाच मुंबईमध्ये एक प्रकार पवई आयआयटीमध्ये घडला आहे. शौचालयाला गेलेल्या एका विद्यार्थिनीला डोकावून पाहणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आणि यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली. हे दोन प्रकरणं ताजे असतानाच नांदेडमध्येही संतापजनक प्रकार उघडकीस आला.

शहराच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी शाळेजवळ जिम्नॅस्टिक असोसिएशन क्लास, जयपाल रेड्डी वय ४० हा क्रीडा प्रशिक्षक चालवितो. त्याच्याकडे विद्यार्थी, विद्यार्थिनी जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षण घेतात. त्यापैकी शहरातील एक पंधरा वर्षीय विद्यार्थिनी त्याच्याकडे जिम्नॅस्टिक क्लासला नियमितपणे येत होती. दि. २८ डिसेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत सदर विद्यार्थिनीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. आपली समाजात बदनामी होईल म्हणून ती हा प्रकार सहन करत होती. विशेष म्हणजे मोबाईलवर अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून तिला त्रस्त करून सोडत होता. एके दिवशी तर क्लासच्या चेंजिंग रूममध्ये ती कपडे चेंज करताना पाहून तिचा वारंवार तो विनयभंग करत असल्याने ती त्रस्त झाली. स्टेट पार्टीसिपेट सर्टिफिकेट व एनओसी मागणी करूनही तो देण्यासाठी टाळाटाळ करत होता. अखेर हा त्रास तिला सहन न झाल्याने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.

नातेवाईकांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. पीडित युवतीला सोबत घेऊन नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. दि. २० सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेली फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी क्रीडा प्रशिक्षक जयपाल रेड्डी (वय 40) याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.

या प्रकरणात पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस फौजदार ए. एस. पवार ह्या तपास करत आहेत. अशा प्रकारच्या घटना अन्य विद्यार्थिनींसोबत घडल्यात का याचा तपास वरिष्ठ स्तरावरून सुरू असल्याचे समजते. या प्रकारामुळे जिम्नॅस्टिक क्लासला आपल्या मुलींना पाठवणाऱ्या पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे. चंदीगड, मुंबईची पुनरावृत्ती नांदेडमध्ये घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!