ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
नांदेड- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले फौजदार शेषराव राठोड यांनी गुरुवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास गोदावरी नदीवर असलेल्या गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने एका माजी सैनिकाच्या तत्परतेमुळे ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या पोलीस मुख्यालयातील फौजदार शेषराव राठोड हे मागील काही दिवसापासून आजारी होते. त्या आजारातून ते कसेबसे सावरले, परंतु त्यांनी गुरुवार दुपारी एकच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ते 50 फूट उंचीवरून खाली नदीपात्रातील पाण्यात पडल्याने त्यांना जास्त दुखापत झाली नाही. मात्र यावेळी याच परिसरात माजी सैनिक असलेल्या एका युवकाने तत्परता दाखवत नदीतील पाण्यात जाऊन त्यांना उचलून बाहेर काढले आणि लगेच शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची माहिती वजिराबादचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, कर्तव्य अधिकारी श्री मोरे व पोलीस अधीक्षक कार्यालयात समजताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलावरून उडी का मारली याचे नेमके कारण मात्र ते शुद्धीवर आल्यानंतरच समजेल असे पोलिसांनी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻