Friday, November 8, 2024

धक्कादायक- मलनि:सारणच्या हौदात पडून दोन कामगारांसह तिघांचा मृत्यू; नांदेडच्या मालटेकडी कामठा परिसरातील खळबळजनक घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– महानगरपालिके अंतर्गत केंद्र सरकारच्या अमृत टू योजनेअंतर्गत मालटेकडी कामठा शिवारामध्ये मलनि: सारण फिल्टर प्लॅंटचे काम सुरू आहे. मलनिस्सारण हौदामध्ये मलवाहिनी चेंबर बंद करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांसह त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यासह तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तीस फूट खाली असलेल्या या तिन्ही मृतदेहांना दोरी लावून बाहेर काढले.

नांदेड शहराच्या मालटेकडी कामठा शिवारामध्ये अमृत योजना टू चे ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे. हे काम शारदा कन्स्ट्रक्शनकडून केल्या जात आहे. या कामावर अनेक कामगार कामाला आहेत. ड्रेनेज लाईन चेक करण्यासाठी कंपनीचे सुपरवायझर शिवरामआप्पा गंदीगुडे यांनी कामगार राजू मेटकर व शंकर वडजे यांना मलनिस्सारण हौदात तीस फूट खाली उतरलेल्या कामगार राजू मेटकर (वय २८) आणि शंकर वडजे ( वय २४) हे दोघेजण मलवाहिनीचे चेंबर बंद करण्यासाठी खाली उतरले. ड्रेनेज लाईनमधून गॅस लिकेज झाला आणि यात गुदमरून बेशुद्ध पडले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कामठा येथील गजानन पुयड हा कुठलाही विचार न करता दोन कामगारांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून खाली उतरला. पण यात त्याचाही गुदमरून मृत्यू झाला.

ही धक्कादायक माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. दुपारी एक वाजता अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, जवान गायकवाड, दिनेश कांबळे, सूर्यवंशी, सचिन आणि चालक खेडकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर बघ्याची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातील काही सुज्ञ नागरिकांची मदत घेत नागरिकांचा उद्रेक होण्यापूर्वी दोरी बांधून अग्निशमन दलाचे जवान ऑक्सिजन वायू लावून खाली उतरले आणि तिन्ही मृतदेह बाहेर काढले.

विशेष म्हणजे कुठलीही सुरक्षेची उपाययोजना न करता हे तिन्ही कामगार इतक्या खोल व जोखमीच्या कामासाठी कोणी पाठवले याबद्दल मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत. तिन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला असून याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!