Saturday, June 22, 2024

धावत्या रेल्वेत चढताना वन कर्मचारी थेट रेल्वेखालीच चिरडला; नांदेड जिल्ह्याच्या किनवट स्थानकावरील धक्कादायक व्हिडिओ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

व्हिडिओ 👇🏻

https://youtube.com/shorts/HrQHRfddn9E?si=zZaTGSrIhOsJ2fwB

किनवट (जि. नांदेड)- धावत्या रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात येथील वन विभागाच्या एका युवा कर्मचाऱ्याने आपला प्राण गमावल्याची धक्कादायक दुर्घटना किनवट रेल्वे स्थानकात बुधवारी दि. २३ रोजी घडली. दरम्यान, या सर्व धक्कादायक प्रकाराचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

किनवट तालुक्याच्या सिरमेट्टी येथील मूळ रहिवाशी असलेला महेंद्र प्रल्हाद कनाके ( वय ३१) हा वर्षभरापूर्वी किनवटच्या वनविकास महामंडळात अनुकंपा धर्तीवर चौकीदार पदावर नोकरीला लागला होता. बुधवारी सकाळी साडे आठच्यादरम्यान महेंद्र कनाके हा आदिलाबाद – नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेसने सहस्त्रकुंड येथे जाण्यासाठी आला होता. महेंद्र हा प्रवासाचे तिकीट काढून गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच रेल्वेगाडीने स्टेशन सोडले. त्यानंतर महेंद्र याने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला.

https://fb.watch/mCHjBo4ZcE/?mibextid=9R9pXO

https://fb.watch/mCHKIH9hW9/?mibextid=9R9pXO

या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरड करीत गाडीची चैन खेचली. पण तोपर्यंत घडलेल्या या दुर्घटनेत महेंद्र कनाके हा प्लॅटफॉर्मवरून ट्रेनखाली चिरडला गेला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारानंतर कनाके याला तातडीने आदिलाबाद येथे हलविण्यात आले. पण, आदिलाबाद येथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बुधवारी सायंकाळी उशिरा महेंद्र याची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!