ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नवीन नांदेड- धुलिवंदन सण साजरा करून गोदावरी नदीवर जाणे काही जणांच्या जीवावर बेतले आहे. विष्णुपुरी जवळ काळेश्वर मंदिरानजीक दोघांचा बुडून मृत्यू झाला असून याच ठिकाणी आलेले इतर आणखी दोघे जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.
विष्णुपुरी येथील काळेशवर मंदिर पाठीमागील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात काल १८ मार्च रोजी दुपारी दुपारी बुडून मृत्यू झाला. काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल दुपारी तीनच्या सुमारास होळी खेळुन नांदेड येथील विजयनगर भागातील जय रुपेश पुजारी (वय १९) व त्याचा मित्र गजानन राजु हाटकर (वय २८) रा.दतनगर नांदेड हे दोघे काळेश्वर मंदिर येथे विष्णुपुरीच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रात पाण्यात उतरले. पण त्यांना पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने आणि त्यातच त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्यात बडुन मरण पावले. ही माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तात्काळ अंमलदार गवळे एम.बी.यांना आदेशित करून घटनास्थळी पाठविले व पाहणी केली. जिवरक्षक दलाच्या पथकावला बोलावून नदीपात्रात त्या दोघांचा शोध घेतल्यानंतर बऱ्याच वेळाने दोघांचे प्रेत हाती लागले.
दोन्ही मृतदेह नदी पात्राच्या बाहेर काढून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला व शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आले. या प्रकरणी विजय रुपेश पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रामदिनेवार हे अधिक तपास करत आहेत. जिवरक्षक सयद नुर पेहलवान यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद मुश्ताक, कालीदास खिल्लारे, सय्यद, शेख, अजिज शेख गफार यांनी नदी पात्रातून मृतदेह शोधून काढले.
दरम्यान याठिकाणी गेलेले इतर दोघे जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. ते याठिकाणी आले आणि बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻