Saturday, June 22, 2024

नक्षलवाद्यांकडून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर डॉक्टरचा बलात्कार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


नांदेड- उपचारासाठी आलेल्या एका युवतीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला ब्लॅकमेल केले. एवढेच नाही तर तुझ्या आई- वडिलांना नक्षलवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.


किनवट तालुक्यातील महाटी (गावाचे नाव बदलून) येथे छत्तीसगड राज्यातील पंकजपुर जिल्हा ह्रदयपूर येथील एका डॉक्टरने “साई क्लिनिक” नावाचे रुग्णालय सुरू केले. रुग्णालय परिसरातच तो वास्तव्यास होता. त्याच्या रुग्णालयात एके दिवशी ज्या ठिकाणी तो राहत होता त्या परिसरातील युवती उपचारासाठी आली. यावेळी त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतले. यानंतर तिला तो ब्लॅकमेल करत होता. यातूनच फोटो व्हायरल करतो म्हणून अनेकवेळा बलात्कार केला. एवढेच नाही तर हा प्रकार उघडकीस आणला तर तुझ्या आई- वडिलांना नक्षलवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी देत तो सतत अत्याचार करत होता. अखेर या युवतीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यावेळी त्यांनाही धक्का बसला.

याप्रकरणी डित युवतीच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी नराधम डॉक्टरला अटक केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!