Friday, March 29, 2024

नगरपंचायत अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत २७ जानेवारी रोजी; V.C. द्वारे होणार सोडत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ राज्यातील १३९ नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत

मुंबई– राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत गुरुवार, दि. २७.जानेवारी २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. नुकत्याच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून आता नगराध्यक्ष कोण होणार, कोणत्या प्रवर्गासाठी ते आरक्षित होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

शासनाने या नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यासाठी तारीख जाहीर केली असून दि. २७.जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०४ वा. प्रधान सचिव (नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्रालय, मुंबई येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. सद्यिस्थितीत कोवीड-१९ च्या संक्रमणामुळे विहीत केलेले आयोग्य विषयक निकषांमुळे, सदर सोडतीसाठी संबंधित अधिकारी/लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी सर्व विभागीय आयुक्त याबाबत कळविले असून  सदर सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात दुरदृष्यप्रणाली (व्हिडीओ कॉन्फरनस V.C.) ची व्यवस्था करावी. तसेच सदर सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १० लोकप्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!