ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– मागील अडीच वर्षापासून जिल्ह्याची धुरा उत्कृष्टपणे सांभाळणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. आज दि. 18 ऑगस्ट रोजी हे आदेश काढण्यात आले असून मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
विपिन ईटनकर यांनी तात्काळ विभागीय अधिकारी यांना माहिती देऊन आपल्या पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे देऊन नागपूर जिल्हाधिकारी पदाचे सुत्रे हातात घ्यावीत असेही आदेशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर हे कोरोना काळाच्या काही दिवस आधी लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नांदेडच्या जिल्हाधिकारीपदावर पदोन्नतीने बदली होऊन आले होते.
महाभयंकर कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. स्वतः कोरोनाबाधीत झाले तरी त्यांनी आपल्या सेवेत तत्परता ठेवली होती. आज अचानक त्यांच्या बदलीचा आदेश नांदेडमध्ये धडकला. मात्र त्यांच्या रिक्त जागी जिल्हाधिकारी म्हणून तूर्त तरी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻