Monday, June 17, 2024

प्रमोदकुमार शेवाळे यांची बदली, श्रीकृष्ण कोकाटे नांदेडचे नवे पोलीस अधिक्षक; लातूरचे एसपी निखिल पिंगळे यांचीही बदली, सोमय मुंडे नवे एसपी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

◆ 25 अधिकाऱ्यांना देण्यात आली नियुक्ती, बहुतांश जिल्ह्यांचे एसपी बदलले

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी 👇🏻

नांदेड– भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत. नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची बदली झाली असून नांदेडच्या नवीन पोलीस अधिक्षकपदी मुंबईतील पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर लातूरचे एसपी निखिल पिंगळे यांचीही बदली करण्यात आली असून गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची लातूरचे नवे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु झाले आहे. नांदेडच्या पोलीस अधिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान गृहविभागाने 20 ऑक्टोबर रोजी बदली व पदस्थापनेचे आदेश निर्गमीत केले आहेत. यानुसार मुंबईतील पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेडचे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या बदलीच्या ठिकाणचे आदेश अद्याप निर्गमीत करण्यात आलेले नाहीत.

राज्यातील एकूण 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यापैकी 25 जणांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित 20 अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या ठिकाणावरून बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. येत्या काही दिवसात या अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या नियुक्त्या देण्यात येतील असे सांगण्यात येते.

नियुक्ती देण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे

धनंजय आर कुलकर्णी : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत – पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

पवन बनसोड : अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बसवराज तेली : पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली

शेख समीर अस्लम : अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा

अंकित गोयल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

शिरीष एल सरदेशपांडे : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण

राकेश ओला : पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर

एम. राजकुमार : पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव

रागसुधा आर. : समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी

संदीप सिंह गिल : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली – पोलीस अधीक्षक, हिंगोली

श्रीकृ्ष्ण कोकाटे : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड

सोमय विनायक मुंडे : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली – पोलीस अधीक्षक- लातूर

सारंग डी आवाड : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा

गौरव सिंह : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ

संदीप घुगे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई – पोलीस अधीक्षक, अकोला

रवींद्रसिंग एस. परदेशी : उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

नुरुल हसन : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा

निखील पिंगळे : पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया

निलोत्पल : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली

संजय ए बारकुंड : पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे

श्रीकांत परोपकारी : प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

सचिन अशोक पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद

लक्ष्मीकांत पाटील : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पराग शाम मणेरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई

सिंगुरी विशाल आनंद : मा. राज्यपाल यांचे परिसहायक- पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!