Sunday, January 29, 2023

नांदेडचे प्रसिद्ध नर्तक डॉ. भरत जेठवाणी बनले सान्वी जेठवाणी; लिंग परिवर्तन करीत स्त्रीत्व स्वीकारले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड-  नांदेडमध्ये एक वेगळी सांस्कृतिक ओळख असणारे दिग्गज कलावंत नर्तक डॉ. भरत जेठवाणी यांनी लिंग परिवर्तन केल्याची माहिती आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज असणाऱ्या व्यक्तिंना Gender syphoria असे मेडिकल भाषेमध्ये संबोधले जाते. अशा व्यक्तींसाठी मेडिकल सायन्समध्ये शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन करता येते, ज्यास sex reassignment surgery (srs) असे म्हणतात. ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचे समजल्यावर डॉ जेठवानी यांनी हा धाडसी निर्णय घेत पुरुषाऐवजी आता स्त्रीरूप प्राप्त केले आहे.

डॉ. भरत जेठवाणी यांची सान्वी जेठवाणी अशी नवीन ओळख असणार आहे. या ऑपरेशनसाठी विविध चाचण्या या रुग्णास कराव्या लागतात. मानव रोगतज्ज्ञापासून ते प्लास्टिक सर्जरी करेपर्यंत याची एक मोठी प्रक्रिया आहे. हक्क संरक्षण 2019 या कायद्या अनुसार विविध हक्क अशा व्यक्तींना मिळत आहे. जेठवाणी यांनी सदरील ऑपरेशन दिल्ली येथील ऑलमॅक या खाजगी रुग्णालयात करून घेतली. हा प्रवास किती कठोर होता याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माणसाची ओळख ही चारित्र्याने व आत्मयाने होत असते. त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजे असे मत पत्रकारांशी बोलत असताना जेठवाणी यांनी व्यक्त केले. लहानपणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजात देखील स्थान मिळेल, समाजाने व मित्रमंडळींनी मला प्रोत्साहन देऊन इथपर्यंत आणलं आहे. पुढेही सहकार्य करून साथ देऊन वाटचालीस मला मदत करतील अशी आशा सर्वांकडून बाळगते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जेठवाणी यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. हे कार्य आयुष्यभर सुरू राहणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. समाजाच्या हितासाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्यातही त्यांचा सहभाग असतो. रक्तदान शिबिर आयोजित करणे, राष्ट्रीय एकता रॅली आयोजित करणे, सांस्कृतिक समारंभ भरवणे, झाडे लावणे व अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत स्वतःची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील केली आहे.

लिंग भेदभाव आणि त्यातील फरक मिटवून टाकायचा आहे व माणसाची ओळख माणूस म्हणून राहिली पाहिजे यासाठी देखील आपण कार्य करणार आहोत असे त्यांनी सांगितले. अनेक लोकांना आता याबाबत उत्सुकता झाली असून अनेक संशोधकार या विषयावर त्यांच्यासोबत मिळून संशोधन करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जेठवाणी हे नांदेड चे पहिली परिवर्तीत महिला ठरले आहेत. त्यांनी हा धाडसी निर्णय घेऊन एक नवीन जीवनास प्रारंभ केला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,684FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!