Monday, December 11, 2023

नांदेडचे प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णा लोकमनवार यांचे वाराणसीजवळ अपघातात निधन; चातुर्मासानिमित्त वाराणसीला गेलेल्या आईला परत घेऊन येताना ट्रकने उडवले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील प्रतिष्ठीत व्यावसायिक, हॉटेल सेंट्रलपार्कचे मालक तथा संतूर व जेमिनी ऑईलचे नांदेड जिल्ह्याचे वितरक कृष्णा बालाप्रसाद लोकमनवार (वय ४५) यांचे उत्तरप्रदेश राज्यातील राष्ट्रीय महामार्ग १९ वरील चुनार येथे (जि. मिर्झापूर) झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. ही घटना रविवारी (दि.२१) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदेडकडे येत असताना घडली. दरम्यान, त्यांच्या पार्थीवावर मंगळवार (दि.२३) दुपारी गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्यापारी कृष्णा बालाप्रसाद लोकमनवार त्यांच्या मातोश्री चातुर्मासानिमित्त वाराणसी येथे होत्या. मातोश्रींना परत नांदेडकडे आणण्यासाठी म्हणून व्यापारी लोकमनवार हे शनिवारीच (दि.२०) वाराणसी येथे खासगी वाहनाने गेले होते. मातोश्री व त्यांच्या मावशींसोबत घेऊन ते रविवारी परत नांदेडकडे निघाले होते. याचवेळी वाराणसीपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग १९ वरील चुनार येथे (जि.मिर्झापूर) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते लघुशंकेसाठी म्हणून वाहनातून उतरले. यावेळी रस्ता ओलांडणार तोच पाठीमागून एका भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. यात ते जागीच मृत झाले. वाराणसी येथून विमानाने त्यांना हैद्रबाद येथे आणण्यात आले. हैद्रबादवरुन त्यांचा मृतदेह आज सोमवारी रात्रीपर्यंत नांदेडमध्ये दाखल होईल.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.  त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२३) दुपारी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे नातेवाईक विजयकुमार लोकमनवार यांनी सांगितले. जितेंद्र लोकमनवार यांचे ते बंधू होत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!