ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई/ नांदेड- नांदेडचे भूमिपुत्र, सध्या एमएमआरडीएचे सह व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पुलकुंडवार यांनी त्वरित नवीन कार्यभार स्विकारावा असे आदेश काढण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिकेचा 22 मार्च रोजी आयुक्त तथा प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी पदभार स्विकारला होता. मात्र आता आयुक्त पवार यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्वरीत हा पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले असल्याने ते उद्या पदभार स्विकारतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. पुलकुंडवार हे नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांनी नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर काम केलेले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
