Saturday, July 27, 2024

नांदेडचे माजी महापालिका आयुक्त; आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना पुणे पोलिसांकडून अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

राज्यभर गाजत असणाऱ्या टीईटी घोटाळा प्रकरणात (TET Scam Case) पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून केली अटक

पुणे : राज्यभर गाजत असणाऱ्या टीईटी घोटाळा प्रकरणात (TET Scam Case) पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांचे पथक त्यांना ठाणे येथून पुण्याला घेऊन निघाले आहेत. खोडवेकर हे नांदेड येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यावेळीही येथे अनेक वाद निर्माण झाले होते.

पुणे पोलिसांनी २०१९-२० चा टीईटी घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणात आयुक्त तुकाराम सुपे तसेच शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि यात सहभागी इतरांना अटक करण्यात आलेली आहे. तपासात त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. तपासात ही खळबळजनक बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सावरीकर याच्याकडून पैसे घेतल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, अनेक मुलांना पास केल्याचे समोर आले आहे. त्यांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगून ही मुले पास केली असल्याचे सांगण्यात येते. सुशील खोडवेकर यांनी सावरीकरकडून पैसे घेतले आणि सुपेंना सांगून मुले पास केली आहेत, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खोडवेकर हे मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अटकेचे वृत्त नांदेडमध्ये धडकताच येथेही मोठी खळबळ उडाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!