Friday, July 19, 2024

नांदेडचे सुपुत्र झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भारतीय पोलीस सेवा 1995 बॅचचे अधिकारी, झारखण्ड राज्यात कार्यरत अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. अत्यंत प्रतिष्ठित असा हा बहुमान देशाच्या पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो.

श्री. लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली 26 वर्ष देशातील बिहार, झारखण्ड, महाराष्ट्र राज्य व सीआरपीएफमध्ये अत्युत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी 8 विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आले असून त्यात राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक, 2 वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखण्ड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे.

बिहार व झारखंड राज्य सरकारद्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आलेले असून सीआरपीएफ मध्ये गडचिरोली व नागपुर येथे डीआयजी तसेच रांची व मुंबई येथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी 11 डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आलेली आहेत. आत्तापावेतो 60 पेक्षा अधिक प्रशस्तिपत्रेही त्यांना मिळालेली आहेत.

महाराष्ट्र राज्यात संजय आ. लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने 2 वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देवून गौरविलेले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!