Saturday, December 21, 2024

नांदेडच्या मुरमुरा गल्लीत भररस्त्यात छातीत चाकूने भोसकून एका युवकाचा खून

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भररस्त्यात थरार

नांदेड– वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुरमुरा गल्ली भागात एका तीस वर्षीय युवकाचा छातीत चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी दि. २१ डिसेंबर रोजी घडली.

जुना मोंढा परिसरातील मुरमुरा गल्ली भागात लखन उत्तम जाधव (वय ३०) राहणार देवापुर तालुका मुदखेड याच्यावर कुठल्यातरी जुन्या वादातून आरोपीने चाकूने हल्ला केला. गर्दीच्या ठिकाणी आरोपीने लखन जाधव याच्या छातीत चाकूने भोसकून त्याला ठार केले. हा प्रकार राधे गोविंद आणि सेवा ट्रेडिंग या दोन दुकानाच्या दरम्यान घडला. विशेष म्हणजे यावेळी या भागात येणाऱ्या- जाणाऱ्यांची व ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र एवढ्या गर्दीमध्ये आरोपी हा खून करून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी त्याला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले. मृतदेहाच्या बाजूलाच त्याचे आधार कार्ड आणि खून करण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!