Saturday, July 27, 2024

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आग; मोठा अनर्थ टळला, अनेक झाडे जळून भस्मसात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात काल दि.15 एप्रिल रात्री नऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत महाविद्यालयातील बांबूची जवळपास दोनशे झाडे जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने वेळीच धाव घेऊन आग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत गार्डच्या सांगणावरून रात्री 9 वाजेच्या सुमारास काही अज्ञात मुलांनी पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ही आग भडकत गेली. याठिकाणी असलेली 30 फुटांची अनेक झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन भस्म झाली. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

यशवंत महाविद्यालयासमोरील असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात बांबूंची अनेक झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कक्ष आहे. सुरक्षा कक्षाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर बांबूची दाट झाडे असल्याने या ठिकाणी अचानक आग भडकली. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तंत्रनिकेतन परिसरातून आगीचे लोट निघत असल्याचे निदर्शनास येताच ही घटना तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ वाहनासह दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. रात्री खूप उशिरा जर आग उशिरा लागली असली तर ते लवकर कोणाच्या लक्षात आले नसते; परंतु ही आग वेळीच लक्षात आल्याने मनपाच्या अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!