Monday, October 14, 2024

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू, आकडा ३१ वर; पालकमंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ नांदेडमध्ये; मंत्र्यांना दाखवण्यासाठी औषधांची जमवाजमव

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृत रुग्णांचा आकडा पोहचला ३१ वर पोहोचला आहे. या खळबळजनक घटनेनंतर पालकमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेडकडे धाव घेतली असून शासकीय रुग्णालयास भेट देत सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे.

दरम्यान दोन मंत्र्यांना रुग्णालयात औषधी साठा उपलब्ध असल्याचे दाखवण्यासाठी एका टेम्पोद्वारे रुग्णालयात औषधांची जमवाजमव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी रुग्णालयात सुरू होता.

दि. ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरच्या 24 तासात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी हा गंभीर घटना डॉक्टर व औषधाची कमतरतेमुळे झाल्याचे म्हटले आहे. आणखीही ७२  रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले होते, त्यातील सात रुग्ण दोन ऑक्टोबरच्या सायंकाळी ते रात्री दरम्यान मृत्युमुखी पडले आहेत. यात ४ बालकांचा समावेश आहे. त्यामुळे मुत्युचा आकडा ३१ झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी आदेश दिले आहेत तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील विविध पक्षाच्या नेते पदाधिकारी यांनी चौकशी करून दोषीवर करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात रुग्णांचा मृत्यूचा आकडा वाढत असल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या काही रूग्णांना त्यांचे नातेवाईक बाहेर हलवत असल्याचे चित्र आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!