Wednesday, April 17, 2024

नांदेडच्या सिडको परिसरातील घरात डॉक्टर मृतावस्थेत आढळले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड- येथील सिडको परिसरातील शिवाजी चौक भागातील डॉक्टर देवानंद जाजु हे त्यांच्या राहत्या घरी आज दि. २५ मे रोजी मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे.

घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राख व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. डॉक्टर जाजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिकमृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद पांडुरंग पातावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे मेडिकल उघडून साफसफाई करून सकाळी १० च्या सुमारास दवाखान्यात पेशंट आल्यामुळे  डॉ.जाजु यांना मोबाईलवर कॉल केला. पण ते कॉल उचलत नसल्याने काही जण त्यांच्या बेडरूमकडे गेले. बेडरूमचा दरवाजा बंद असल्याने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून पाहिले असता डॉ.जाजू बेडरूममध्ये पलंगावर उघड्या स्थितीत मृतावस्थेत दिसुन आले.

या माहितीवरून ५८/२०२२ नुसार कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, पोहेका शेख जावेद, पोलीस नायक गव्हाणकर, भोपाळकर, कानगुले, महिला पोलीस अंमलदार आरती उदगिरे यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस नाईक शेख जावेद हे अधिक तपास करीत आहेत.

डॉ. जाजू भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत होते, त्यांच्या पत्नी डॉ. सुरेखा जाजू या नांदेड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित डॉ.जाजु यांच्या निधनाचे वृत्त कळताच सिडको परिसरातील डॉ.नरेश रायेवार, डॉ.महाजन, डॉ.गिरीश मिसाळ, डॉ.शिवणकर, किशोर देशमुख, विनोद कांचनगिरे, अतुल धानोरकर, अमोल धानोरकर, मुन्ना डहाळे, सिध्दार्थ धुतराज यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवासस्थानी धाव घेतली. डॉ. देवानंद जाजु यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!