ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– नांदेडमधील काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश असल्याची माहिती खा. अशोक चव्हाण यांची दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर काल शुक्रवारी प्रथमच खा. अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये आले आहेत.
याबाबत माहिती देताना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, येथील नांदेड – वाघाळा महानगरपालिकेच्या मागील मावळत्या कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लगेचच येथील आयटीएम कॉलेज येथे हा प्रवेश सोहळा झाला.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो, असे खा. चव्हाण म्हणाले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻