Saturday, June 22, 2024

नांदेडमध्येही पंचवीस तलवारी जप्त; शिवाजीनगर पोलिसांची धाडसी कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- धुळ्यामध्ये सापडलेल्या तलवारींच्या साठ्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापलेले असतानाच नांदेडमध्येही पुन्हा मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

शहराच्या विविध भागात पोलिसांच्यावतीने सराईत गुन्हेगारांची धरपकड, तपासणी मोहीम सुरू आहे. या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी गोकुळनगर भागात कारवाई करून एका ऑटोसह पंचवीस तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी दि. २९ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड पोलीस दलाच्या वतीने विविध भागात नाकाबंदी, धरपकड, अवैध धंद्यावर आळा बसविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. कधी रात्रीची गस्त तर कधी दिवसाच्या गस्तमध्ये अनेक गुन्हेगारांना शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास बावन गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून विविध घातक शस्त्र नांदेड पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आले आहेत.

शुक्रवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी गोकुळनगर भागात सापळा लावला गोकुळनगर भागातील रोड नंबर 26 वर ऑटो क्रमांक (एमएच२६-एन-५२२४) ह्यात विना परवाना, बेकायदेशीररित्या तलवारी घेऊन जाताना ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून पंचवीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!