ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
५४ हजाराचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
नांदेड- आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र राज्याने बंदी घातलेला विविध कंपन्यांचा गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मरखेल येथे दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली.
मानवी शरीरास अपायकारक असलेला पान मसाला आणि सुगंधित तंबाखू या अन्नपदार्थांवर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. परंतु विनापरवानगी बेकायदेशीररित्या विविध कंपन्यांचा गुटखा सर्वसामान्यांच्या गळी उतरविण्याचे काम हे गुटखा माफिया करत आहेत. शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्रास गुटख्याची विक्री केल्या जाते. अन्न प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर काही काळ गुटखा माफिया सावध होतात. पुन्हा त्यांचे काळे कारनामे सुरूच राहतात. बंदी असलेला गुटखा त्याचा साठा करून काळ्याबाजारात चढ्या दराने विकून आपले उखळ पांढरे करण्याची जणू या माफियामध्येच स्पर्धाच लागली आहे.
अशाच एका कारवाईमध्ये मरखेल येथे बेकायदेशीररित्या सागर पान मसाला बत्तीस हजार एकशे तीस रुपयाचा आणि सुगंधित तंबाखू एस -आर २१ हजार 430 रुपयाचा असा एकूण 53 हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बाबाराव बंडगर यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात अवैध गुटखा साठा करून आणि वाहतूक करणाऱ्या (टीएस ०१-०७२८) चार चालक इस्माईल ईमामसाब बागवान (वय ३५ ) राहणार मरखेल तालुका देगलूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻