ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणे सुरूच असून आजही 451 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण त्यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून. आज मंगळवारी 316 रुग्ण बरे झाले आहेत.
आज एकूण 1566 टेस्टिंग पैकी 451 पॉझिटिव्ह आढळले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्णसंख्या 261 आहेत. तर आज 316 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 566 अहवालापैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 374 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 655 एवढी झाली असून यातील 88 हजार 900 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 655 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 229, नांदेड ग्रामीण 34, भोकर 2, देगलूर 7, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 11, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 8, उमरी 18, बिलोली 4, हिंगोली 6, परभणी 15, औरंगाबाद 2, दिल्ली 1, हैदराबाद 8, वाशीम 1, लातूर 2, अमरावती 2, निझामबाद 2, कोल्हापूर 1, जालना 3, नागपूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 2, बिलोली 19, धर्माबाद 6, हदगाव 2, मुखेड 10, नायगाव 4 असे एकूण 451 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 292, खाजगी रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
आज 3 हजार 100 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 610, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 433, खाजगी रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 3 हजार 100 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 21 हजार 383
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 12 हजार 333
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 655
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 900
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.92 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-46
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 100
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)