Tuesday, May 21, 2024

नांदेडमध्ये कृषी अधिकाऱ्याने केला गोळीबार; कृषी विभागाच्या कला व क्रीडा महोत्सवातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून चौकशी सुरु

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– काही काळापूर्वी गुन्हेगारांच्या गोळीबाराने त्रस्त झालेल्या नांदेडमध्ये आता चक्क एका कृषी अधिकाऱ्याने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. कृषी विभागाच्या कला व क्रीडा महोत्सवात हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांकडून या धक्कादायक प्रकाराची चौकशी सुरु आहे.

कृषी विभाग नांदेडच्यावतीने कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या तीन दिवसीय महोत्सवात खोखो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल सारखे मैदानी खेळ घेण्यात आले. दरम्यान रविवारी शेवटच्या दिवशी नांदेड शहरातील कुसुम सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरत जवळच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. कृषी विभागाचे कृषी अधीक्षक रविशंकर चवलदे यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांसमोर खुल्या कार्यक्रमात पिस्तुल हातात घेऊन हा अधिकारी नाचताना आणि मिरवताना दिसत आहे. दरम्यान सदर अधिकारी हा भोकर कृषी विभागातील अधिकारी काकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या धक्कादायक प्रकाराची माध्यमावर बातमी प्रकाशित व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. शिवाजीनगर पोलिसांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन सविस्तर अहवाल कळविण्याचे सांगितल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी नवीन मोंढा येथील कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून गोळीबार करणारा मात्र पोलिसांना अद्याप सापडला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हे खेळणीतले बनावट पिस्तूल असल्याचा बचाव आता करण्यात येत आहे. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. जर हे खेळणीतले पिस्तुल आहे तर मग ते स्टेजवर का आणण्यात आले होते, स्टेजवर काय लहान मुलांच्या खेळण्याचा कार्यक्रम सुरू होता का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

कृषी अधिक्षक चलवदे गप्प का ?
शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे प्रमुख रविशंकर चलवदे हे याबाबतीत मुग गिळून गप्प आहेत. ते गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आर्थिक हितसंबंधातून हे मौन असल्याची चर्चा केली जात आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!