Friday, July 19, 2024

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार: तलवार घेऊन आलेल्या आरोपीवर पोलिसांनी झाडली गोळी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौठा येथील पोलीस आपल्या घरी येत असल्याची चाहुल लागताच आरोपी संजयसिंह बावरी याने तलवार फिरवत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर हल्ला चढवला. यात प्रत्युत्तर म्हणून घोरबांड यांनी आपल्या सरकारी पिस्तुलातून त्याच्या पायावर एक राऊंड फायर केला. यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भेट दिली आहे.

नांदेड शहरामध्ये 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर शहर व जिल्हाभरात पिस्तुलाचा (अग्निशस्त्र) वापर करणाऱ्या अशा गुन्हेगारांची धरपकड सुरु आहे. यातच कौठा भागात संजयसिंह बावरी हा घरी असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मिळाली. ते आपल्या पथकासह संजू बावरी याच्या घरी त्याला पकडण्यासाठी पोहोचले. ही चाहूल त्याला लागताच त्याने आपल्या हातातील तलवार फिरवत पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच गाडीवर दगडफेक केली. यात पोलीस वाहनाचे काच फुटली असून पोलीस अंमलदार शिवाजीराव पाटील हे जखमी झाले आहे.

हा प्रकार होताच, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संजूसिंग बावरीवर त्यांच्या पिस्तूलातून एक राऊंड फायर केला. तो त्याच्या पायावर लागला असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!