Thursday, March 28, 2024

नांदेडमध्ये डिटोनेटरचा स्फोट होऊन जखमी झालेला कोठडीत; पोलिसांकडून कसून तपास

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● शांतीनगर परिसरात झाला होता एक जण जखमी

नांदेड– विनापरवाना बेकायदेशीररित्या ज्वलंत पदार्थ (डिटोनेटर) स्वतः व आजूबाजूच्या परिसराला धोका होईल अशा अवस्थेत ठेवणाऱ्या व स्वतः या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीच्या घरातून इतवारा पोलिसांनी दहा डिटेनेटर जप्त केले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास इतवारा पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर मोरे करत आहेत.

दिनांक ८ जानेवारी रोजी शहराच्या शांतीनगर भागात एक स्फोट झाला. या स्फोटाची गुप्त माहिती इतवारा पोलिसांना दि. 13 जानेवारी रोजी प्राप्त झाली. दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान शांतीनगर भागातील दीपक धोंगडे यांच्या राहत्या घरी हा स्फोट झाला. त्यात दीपक धोंगडे जखमी झाले. हे स्फोटक साहित्य केशव पवार नावाच्या त्यांच्या नातलगाचे होते. पोलिसांनी या घराची झडती घेतली असता, तेथे अनेक डिटोनेटर सापडले आहेत. या डिटोनेटरची संख्या १० आहे. याबाबत पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि. १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांनी १३ जानेवारी रोजी दीपक दिगंबर धोंगडे यांच्या घरातील १० डिटोनेटर ताब्यात घेतले आहेत.

दि. ८ जानेवारी रोजी स्फोट झाल्यानंतर दीपक दिगंबर धोंगडे हा जखमी झाला, त्यानंतर तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या प्रकरणाची एमएलसी नऊ जानेवारी रोजी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. घरी बल्ब लावत असतांना स्फोट झाला आणि त्याचा मार लागला असे नातेवाईक सांगत आहेत. त्याचवेळी माझे भाऊजी केशव शिवाजी पवार यांनी, लाईट सारखी दिसणारी वस्तु असणारी कॅरीबॅगमध्ये आणून माझ्या मोठ्या सावत्र आईच्या घरात ठेवली होती. ती काय आहे, हे उत्सुकतेपोटी पाहत असतांना एक लाईट काढून ती लाईटच्या बोर्डात लावली असता जोराचा आवाज झाला. त्यातून निघालेल्या छऱ्यामुळे माझ्या दोन्ही हातांवर व पोटावर मार लागला, असे जखमी दीपक याने सांगितले आहे.

पोलिसांनी दीपक दिगंबर धोंगडे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. खोदकाम आणि इतर विविध कामांसाठी डिटोनेटरचा उपयोग केला जात असतो, मात्र याचा स्फोट झाल्याने व ही बाब लपविण्यात आल्याने याप्रकरणी संशय निर्माण झाला होता, आणि पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी याबाबत कसून तपास केला. तसेच हा स्फोटात संशयास्पद असे कांही प्राप्त झाले नसल्याचा गुन्हे प्रगती अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!