Friday, December 6, 2024

नांदेडमध्ये तब्बल पाच पिस्तूलं जप्त; दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना हत्यारांसह अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

● स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड– नांदेडमध्ये गुन्हेगारांकडून गावठी पिस्तुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना हत्यारांसह अटक करून त्यांच्याकडून पाच पिस्तूलं जप्त केली आहेत.

दिनांक 19 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण व दत्तात्रय काळे तसेच पोलीस अंमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही जण घातक शस्त्र जवळ बाळगुन गंभीर गुन्हा करण्याचे तयारीने दबा धरुन बसलेले आहेत अशी ही माहिती मिळाल्यानंतर स्थागुशा, अधिकारी व अंमलदार हे तात्काळ पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत रवाना झाले.

पोलिसांनी श्रावस्तीनगर नाल्याचे जवळील बाभळीचे झुडपाजवळ संशयितांना सापळा रचुन पकडले. यात दक्षक ऊर्फ खरब्या बालाजी सरोदे (वय 25 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड), अक्षय ऊर्फ सोनु दिगंबर शंकपाळ (वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड), प्रशांत ऊर्फ बाळा रोहीदास सोनकांबळे (वय 38 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड), अतुल बबनराव चौदंते (वय 22 वर्षे, व्यवसाय बेरोजगार, रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड) असे सर्व मिळुन आले.

पोलिसांनी त्यांना तिथे थांबण्याचे कारण विचारले असता, त्यांनी सुरुवातीला उडवा-उडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यांना  विचारपुस केली असता, त्यांनी नसररतपुर- शिवाजीनगर नांदेड रोडवरुन जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनांना आडवुन वाहनातील लोकांजवळील पैसे, मोबाईल काढुन घेवुन लुटमार करण्याचे इराद्याने थांबलो आहोत अशी कबुली त्यांनी दिली.

या पाच जणांकडे चार गावठी बनावटीचे पिस्टल, 02 जिवंत काडतुस 01, एअर पीस्टल, एक दोर (कासरा), 04 मोबाईल असा एकुण एक लाख 25 हजार 800 रुपयांसह घातक शस्त्र व अग्नीशस्त्र मिळुन आले. हे सर्व आरोपी घातक अग्नीशस्त्रास्त्र बाळगुन दरोड्याचे तयारीत असल्याचे मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द पोउपनि परमेश्वर चव्हाण यांचे फिर्यादीवरुन पो. स्टे. शिवाजीनगर गुरनं. 145/2022 कलम 399, 402 भा. दं. वि. सहकलम 3/25, 6/28 भा. ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींपैकी तीन आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी त्यांचेकडील गावठी बनावटीचवे पिस्टल हे आरोपी अजहरखान ऊर्फ बांगा अजहर रहीमोद्दीनखान रा. श्रावस्तीनगर नांदेड याचेकडुन घेतले असल्याची माहितीही पोलिसांना दिली. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या आरोपींना पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचेकडे देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि परमेश्वर चव्हाण, डी. एन काळे, सपोउपनि जसवंतसिंघ शाहु गोविंद मुंडे, पोहेकॉ गुंडेराव करले, सखाराम नवघरे, सुरेश घुगे, दशरथ जांभळीकर, मारोती तेलंग, संजय केंद्रे, पो ना  अफजल पठाण, रुपेश दासरवार पद्मसिंह कांबळे, बालाजी तेलंग हाणमंत पोतदार, विठ्ठल शेळके, पोकॉ  देवा चव्हाण, गणेश धुमाळ, बजरंग बोडके, चालक/शंकर केंद्रे, कलीम शेख यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!