ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई
नांदेड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्त दरम्यान एका आरोपीला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस आणि एक मॅक्झिन आढळून आली, पोलिसांनी ती जप्त केली आहे. ही कारवाई आज गुरुवार दि.15 डिसेंबर रोजी करण्यात आली. सोमवारीही एका युवकाकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली होती, हा युवक एका खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपी होता. यानंतर आज पुन्हा जिवंत काडतुसांसह गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे दत्तनगर, खोब्रागडेनगर, भागात गस्त (पेट्रोलींग) करत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दत्तनगर येथील आदिनारायण हॉस्पीटलच्या समोरील रोडवर बाजुला एक युवक साई दिपकसिंह गहेरवार (वय 22) रा. बाबानगर नांदेड (ह. मु. ढवळे कॉर्नर, सिडको नांदेड) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल (किंमत 40 हजार रूपये) व मॅग्झीन मध्ये तीन जिवंत काडतूस (किंमत दीड हजार रूपये) असा एकुण 41 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवाजीनगर गुरन 443/ 2022 कलम 3/25 भाहका कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, डॉ. खंडेराव धरणे, उप विभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, फौजदार मिलींद सोनकांबळे, हवालदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, अंमलदार रवि बामणे, दत्ता वडजे, देवीसिंग सिंघल, शेख अझर, विष्णु डफडे यांनी केली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
