Friday, June 9, 2023

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; आधी गोळी झाडली मग तलवारीने वार, एक जण जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुप्पा येथे पिस्तुलातून गोळी मारून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रयत्न अपयशी ठरला. तलवारीने संबंधित युवकाला जखमी करून हल्लेखोर पसार झाला.

नांदेड पोलीस अवैध शस्त्र पकडण्यात भरपूर मेहनत घेत असतांना शनिवार दि. 30 एप्रिल रोजी दुपारी जवाहरनगर तुप्पा येथे गोळीबार झाला. गोळीचा नेम चुकला तेंव्हा गोळी मारणाऱ्याने तलवारीच्या सहाय्याने एकाला जखमी करून पळ काढला आहे. नांदेड शहरात व जिल्ह्यात अवैध बंदुका, तलवारी, खंजीर जप्त करून गुन्हेगारांवर जरब आणण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. पण शनिवारी पुन्हा एकदा गोळीबार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी जवाहरनगर तुप्पा भागात दिलीप पुंडलिकराव डाखोरे रा. शंभरगाव ता. लोहा याने पिंटु कसबे या युवकावर क्षुल्लक कारणावरुन गावठी पिस्तूलातून गोळी झाडली. परंतू डाखोरेचा नेम चुकला आणि गोळी पिंटुला लागली नाही. तेंव्हा डाखोरेने तलवारीच्या सहाय्याने पिंटु कसबेच्या पायावर मारून त्याला जखमी केले आणि तो पळून गेला.

याबाबत सांगण्यात आले की, दिलीप डाखोरे हा एका गॅंगचा एक सदस्य आहे. गोळीचा नेम चुकला तरी त्याने तलवारीच्या सहाय्याने युवकाला जखमी केले. याचा अर्थ त्याच्याकडे दोन अवैध हत्यारे होती आणि ही दोन्ही अवैध हत्यारं घेऊन तो वावरत होता. घटनेची माहिती मिळताच ईतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ. सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड सुध्दा त्या ठिकाणी पोहचले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जखमेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,803FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!