Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीवर परभणीच्या दोघांनी झाडली गोळी, बाफना ब्रिजवर थरार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर सोमवार दिनांक न‌ऊ जानेवारीच्या रात्री अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी त्यांची दुचाकी सव्वाअकराच्या दरम्यान बाफना उड्डाणपूलाजवळ येताच त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरून व ओळखीचा असलेल्या रहीम खान आणि जफर या परभणीच्या दोघांनी व त्यांच्यासोबत एक अनोळखी यांनी सविता गायकवाड यांना थांबवले. ओळख असल्यामुळे सविता गायकवाड थांबल्या. यावेळी त्यांनी वाद घालून आपल्या जवळील पिस्तूलमधून गोळी मारली. यावेळी यात त्यांच्या डाव्या दंडातून गोळी आरपार बाहेर पडली आणि त्या जखमी झाल्या. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

इतवारा पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना ही माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून रुग्णालयात जाऊन जखमी सविता गायकवाड यांची भेट घेतली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता गायकवाड आणि अतीक नावाच्या दोघांनी आयचर खरेदी विक्रीच्या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अतीक याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र सविता गायकवाड यांना 14 (1) ( अ) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणात परभणी येथील रहीमखान याने साक्ष दिली होती. याचा राग मनात असल्याने सात जानेवारी रोजी सविता गायकवाड आणि फैसल हे दोघेजण परभणी येथे जाऊन रहीम खान याच्या घरात त्यांनी जावून विचारले. रहीमखान याच्या घरात त्यांनी गोंधळही घातल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी परभणी शहरात या दोघांविरुद्ध भादविच्या 452, 325, 506 गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर माझ्या घरी येऊन वाद का घालते म्हणून रहीमखान आणि जफर आणि त्याचा एक अनोळखी या तिघांनी हा प्रकार घडवून आणल्याचे प्राथमिक तपासणी मध्ये आढळून येत असल्याचे पोलीस निरीक्षक श्री धबडगे यांनी सांगितले. मात्र जखमी सविता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध भादविच्या 307, 34 आणि 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेख असत करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!