Sunday, October 6, 2024

नांदेडमध्ये पुन्हा रुग्णालयावर कारवाई; आज निरामय हॉस्पिटलला दंड, जैविक कचरा प्रकरण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– नांदेडमध्ये पुन्हा एका रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयातील निघालेला जैविक कचरा इतर कचरावाहू ट्रॅक्टरमध्ये टाकल्यामुळे महापालिकेच्यावतीने निरामय हॉस्पिटलला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

बुधवार दि. 23 फेब्रुवारी रोजी मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय क्रमांक तीन हद्दीतील प्रभाग-1 अंतर्गत शिवाजीनगर येथील निरामय हॉस्पिस्टल यांनी बायो-मेडीकल वेस्ट हे  कचरावाहू ट्रॅक्टरमध्ये टाकून शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याच्या प्रकाराबद्दल या हॉस्पिटलवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच बोयो-मेडीकल वेस्ट नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वैद्यकीय व्यवसाय चालकाविरुद्ध कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उप-आयुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे सहा आयुक्त गुलाम मो. सादेक, क्षेत्रिय अधिकारी रमेश चौरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गदमवार, स्वच्छता निरिक्षक बालाजी देसाई, संजय जगतकर, वसिम तडवी, किशन तारु व ईतर कर्मचारी हजर होते.

शहरातील सर्व हॉस्पीटल, क्लिनिक, दवाखाने इत्यादी व्यवसायधारकांना नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने आवाहन केले आहे की, दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा (Bio-medical waste) मनपाच्या घंटागाडीत किया सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अनाधिकृतरित्या न टाकता मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे सुपूर्द करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 व बॉयोमेडीकल वेस्ट हेन्डलींग रुल्स् 1998 मधील तरतुदीनुसार संबंधित वैद्यकीय व्यवसाय धारकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!