Saturday, June 22, 2024

नांदेडमध्ये पोलिसांचा लॉंगमार्च; विविध सणांच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक व गुन्हेगारांवर राहणार सीसीटीव्हीची नजर, ड्रोन कॅमेराही करणार टेहळणी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– कोरोना महामारीचा संसर्गानंतर तब्बल दोन वर्षांनी श्री राम नवमी उत्सव भव्य मिरवणुकीने साजरा होत आहे. साहजिकच हा उत्सव रामभक्त मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पाडणार आहेत. परंतु या उत्सवाच्या दरम्यान समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचवली जाऊ नये यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. राम नवमीनिमित्त शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक नऊ एप्रिल रोजी इतवारा पोलीस ठाणे ते भाग्यनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोलिसांनी लॉंगमार्च काढला. मिरवणूक जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून समाजकंटकांच्या व गुन्हेगारांच्या हालचाली ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही टिपण्यात येणार आहेत.

नांदेड शहरात यावर्षी श्री राम नवमी उत्सवउत्साहात साजरा करण्यासाठी मागील काही दिवसांपासून रामभक्त परिश्रम घेत आहेत. रामनवमीनिमित्त रविवारी सकाळी भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरापासून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अशोक नगर येथील हनुमान मंदिर पर्यंत राम नवमीची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य, भजन, कीर्तन, लेझीम व महाभारत, रामायणावर आधारित काही देखावे (झाकीं) सादर करण्यात येणार आहे.

ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून म्हणजेच जुना मोंढा, देना बँक चौक, महावीर चौक, वजिराबाद मुख्य मार्केट, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप मार्गे अशोकनगर भागात पोहोचणार आहे. या मिरवणुकीच्या मार्गावर नांदेड पोलिसांनी जागोजागी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच काही पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हालचाली ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही टिपण्यात येणार आहेत.

उद्या दिनांक १० रोजी नांदेड शहर व जिल्हात श्रीराम नवमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. नांदेड शहरात ७ व ग्रामीण भागात २१ मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मिरवणुका काढण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे यावर्षी मिरवणुकीसाठी श्रीराम भक्तांमध्ये उत्साह आहे.

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर सदर मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पडाव्यात म्हणून पोलिसांतर्फे मागील एक महिन्यापासुन आयोजकांसोबत तसेच समाजातील विविध घटकांसोबत बैठका व कॉर्नर मिटींग घेवून सुसंवाद निर्माण करण्यात आला आहे. आयोजकांना पोलिसांनी नियम व अटीसह परवानगी दिली असून नियमांसह व शिस्तीमध्ये मिरवणूक काढणेबाबत आयोजकांनीही आश्वस्त केले आहे.

शहरातील मुख्य मिरवणुक मार्गावर प्रमुख चौकातील ५० CCTV कॅमेरे व्यतिरिक्त २९ महत्वाचे ठिकाणी तात्पुरते CCTV कॅमेरे लावण्यात आले असून सोबतच ड्रोन कॅमेरा तसेच व्हिडीओ कॅमेराद्वारे सुध्दा मिरवणुकीतील हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. श्रीरामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान संदर्भाने दिनांक ०८ रोजी जिल्ह्यातील शांतता कमिटीचे आयोजन नियोजन भवन नांदेड येथे करण्यात आले होते. बैठकीत सर्व सदस्यांनी सर्व सण, उत्सव उत्साहात तसेच शांततेत पार पडतील यासाठी सर्व सहकार्य करणेबाबत प्रशासनास आश्वस्त केले आहे.

नांदेड शहरातील मुख्य मिरवणुकीसाठी २ अपर पोलीस अधीक्षक, ०८ पोलीस उप अधीक्षक, ३१ पोलीस निरीक्षक, १६६ सपोनि/पोलीस उप निरीक्षक यांचे सह १३०२ अंमलदार, ०५ आरसीपी प्लाटून व १००० होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव देलाच्या तीन कंपन्याही बंदोबस्तासाठी दाखल झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लॉंगमार्च अर्थात पथसंचलन केले. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर, भगवान धबडगे, अनिरुद्ध काकडे, सुधाकर आडे, अशोक घोरबांड, जगदीश भंडरवार यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दलाचे जवान यासह आदींनी सहभाग नोंदविला होता. सण उत्सवाच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!