Tuesday, October 15, 2024

नांदेडमध्ये पोलिसांनी पकडले चार गावठी पिस्टल, 30 जिवंत काडतुसं, 1 मॅग्झीन; मध्यप्रदेशातून पिस्टल आणून नांदेडमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

वजिराबाद पोलिसांची कारवाई

नांदेड- मागील काही वर्षापासून नांदेड शहरामध्ये गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात अवैध पिस्तुलांचा वापर होत आहे. हे पिस्तूल येतात कुठून व कसे येतात याच्या मुळाशी आता नांदेड पोलीस पोहोचले आहेत. मध्यप्रदेशातून पिस्टल घेऊन नांदेडमध्ये विकणाऱ्या टोळीच्या अखेर वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या. या टोळीकडून चार पिस्तूल, 30 काडतूस, एक मॅक्झिनसह जवळपास सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आता या टोळीकडून कोणाकोणाला पिस्तूल विकण्यात आली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या गोळीबार घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी ( शहर ) चंद्रसेन देशमुख, इतवारा उपविभागाचे डीवाय‌एसपी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने दिनांक सहा एप्रिल रोजी अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवून अभिलेखावरील शस्त्र बाळगणाऱ्या अनेक गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्या हालचालीची व नांदेड शहरात शस्त्र आणून विक्री करणाऱ्या बाबतची माहीती घेण्याचा प्रयत्न केला.

दिनांक ७ एप्रिल रोजी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती हिंगोली गेट उड्डानपुलाखालील फुलमार्केट परिसरामध्ये गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला असून सध्या त्याचे कमरेला एक पिस्टल असल्याची माहिती मिळाली. सदर माहीतीच्या अनुषंगाने चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी  सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे, हवालदार दत्तराम जाधव, अंमलदार शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, विजयकुमार नंदे, शेख ईम्रान शेख एजाज, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, भाऊसाहेब राठोड, अरुण साखरे सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. सदर ठिकाणी एक व्यक्ती लोकांच्या गर्दीमध्ये संशयास्पद हालचाली करीत असतांना दिसून आल्याने त्यास पकडून त्यास  विचारणा केली असता त्याने आपले नांव भोलासिंघ उर्फ हरजितसिंघ उर्फ पोलो चरणसिंघ बावरी, राहणार एनडी 41 सिडको नांदेड असे सांगितले.

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व सात जिवंत काडतुस व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मिळुन आली. सदर प्रकरणी अंमलदार विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.न. 101/2023 कलम 3/25 भारतीय दंड विधानप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासात तपासिक अंमलदार शिवराज जमदडे यांनी आरोपीस अधिक विश्वासात घेउन विचारणा केली असता सदर आरोपीने ईतर तीन गावठी पिस्टल व काडतुस नांदेड शहरात विक्री केल्याची माहिती दिल्यावरुन आरोपी रोशन सुरेश हाळदे, राहणार गोविंदनगर नांदेड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडुन एक गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. तसेच महमद तौफीक शेख सनदलजी रा. गल्ली नंबर 24 लक्ष्मीनगर, जुल्लेखा मस्जीदजवळ नांदेड यांचेकडुन दोन गावठी पिस्टल मॅग्झीनसह, 23 जिवंत काडतुस एक रिकामी मॅग्झीन जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचे तपासात गावठी पिस्टल मध्यप्रदेश राज्यातून आणून विक्री होत असल्याचे उघड झाल्याने त्यामध्ये कलम 7/25 भारतीय शस्त्र अधिनियम हे कलम वाढ करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश राज्यातुन गावठी पिस्टल आणुन विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार गावठी पिस्टल, 30 जिवंत काडतुस, 1 मॅग्झीन, व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह 1 लाख 13 हजार 100 रुपयाचा ऐवज जप्त केल्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथक वजिराबाद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!