Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, महिनाभरात 15 पिस्तुलं, 43 तलवारी, 28 चाकू- खंजर जप्त, 62 आरोपींना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

आज दोन युवकांकडून तीन खंजीर जप्त

नांदेड– येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी गुन्हेगारांची सुरू केलेली धरपकड मोहीम सुरूच आहे. गत महिनाभरात पोलिसांनी 62 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 43 तलवारी, 28 चाकू- खंजर, 15 बनावट आणि गावठी पिस्तुलं जप्त केली आहेत. यासंदर्भात पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहराच्या एमजीएम महाविद्यालय परिसरासमोर राहणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररीत्या तीन खंजर जप्त केल्या आहेत. दोन आरोपीविरुद्ध विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक बाळू गीते यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी नाथनगर कमानीसमोर मुख्य रस्त्यावर थांबलेल्या सचिन परमेश्वर शिंदे (वय 22) राहणार एमजीएम कॉलेज समोर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चारचाकी वाहनात दडवून ठेवलेल्या दोन खंजर आढळून आले. पोलिसांनी (एमएच20-बीटी- 99 26) चारचाकी वाहनाला ताब्यात घेत दोन खंजर जप्त केले आहेत. बाळू गीते यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात सचिन शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत पोलीस अंमलदार बंडू कलंदर हे गस्त घालत असताना विनापरवाना बेकायदेशीररित्या खंजर बाळगणार्‍या दिलीप हरिसिंग पवार (वय ३५) याला अटक केली. त्याच्याकडून खंजर जप्त करण्यात आले आहे. बंडू कलंदर यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार देशमुख आणि हवलदार पांचाळ करत आहेत.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसह विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अभिलेखावरील भारतीय हत्यार कायद्याखाली दाखल गुन्ह्यातील एकूण 96 आरोपींपैकी 73 आरोपी तपासण्यात आले. त्यापैकी 63 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 55 आरोपी घरी मिळून आले तर सात आरोपींवर तपासणीदरम्यान कारवाई करण्यात आली. 5 एप्रिल ते 3 मे दरम्यान शहरात व जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवून संशयित गुन्हेगार व्यक्तीकडून गावठी पिस्टल, बनावट पिस्टल तलवार, खंजीर, गुप्ती असे वेगवेगळे हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस विभागातर्फे जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही विनापरवाना, बेकायदेशीर हत्यार जवळ ठेवू नये, बाळगू नये, विनापरवाना हत्यार मिळून आल्यास आपल्या कुटुंबातील जेष्ठ नागरिक, महिला, मुलींना विनाकारण त्रास होईल असे वागू नका, कोणाकडे हत्यार असतील तर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

1 COMMENT

  1. I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last several posts are great quality so I guess I will add you back to my daily bloglist. You deserve it my friend 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!