ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या नवीन कौठा म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या पत्नीसह जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना दोन मे रोजी सकाळी घडली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन कौठा येथील म्हाडा कॉलनीत राहणारे अडवोकेट बी. जी. राजे आणि त्यांच्या शेजारीच राहणारे शिवाजी महाजन पटणे यांच्यात मोकळ्या जागेवरून मागील काही दिवसांपासून वाद होता. या वादातूनच एडवोकेट राजे यांच्या घरी जाऊन शिवाजी पटणे, योगिता शिवाजी पटणे, माया शिवाजी पटणे आणि शिवाजी महाजन पटणे यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. यावेळी राजे आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा राजे यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत करण्यात आली आहे.
राजे त्यांच्या पत्नी पौर्णिमा सध्या बेशुद्ध असून दोघांवरही नांदेडच्या यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
