Wednesday, July 24, 2024

नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली प्रतिष्ठाने, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

श्रीनगर आणि शिवाजीनगर भागात किरकोळ घटना वगळता बंद शांततेत

नांदेड– जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील बांधव मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सोमवार, दि.४ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीनगर भागात दोन ठिकाणी तर शिवाजीनगर भागात एका ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दगड मारून दुकानाच्या व गाडीच्या काचा फोडल्या. हा घटना वगळता बंद शांततेत पार पडला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

तर किनवट येथील आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत पैनगंगेत आंदोलन केले. अर्धापूरमध्ये गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शहरातील राज कॉर्नरपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी ११ वाजता पदयात्रा काढण्यात आली. सदरील पदयात्रा राज कॉर्नर, श्रीनगर, महात्मा फुले चौक आय टी आय, शिवाजीनगर, कला मंदिर, एसपी ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत पोहचली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

महाराजांच्या पुतळ्याजवळ ही पदयात्रा पोहचल्यावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून राज्य सरकारचा  निषेध व्यक्त करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे आजच्या बंदमध्ये राजकीय नेते- पदाधिकाऱ्यांना पुढाकार घेऊ देण्यात आला नाही. आंदोलनात विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठा बांधव यांच्यासह विविध पक्षांचे नेते- पदाधिकारी सहभागी झाले होते.

आजच्या या नांदेड जिल्हा बंदमध्ये बालक, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या या बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्हा बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घेऊन स्वतः व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुरज गुरव, इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, शिवाजीनगर ठाण्याचे मोहन भोसले, वजिराबादचे अशोक घोरबांड, विमानतळ ठाण्याचे नागनाथ आयलाने, इतवारा ठाण्याचे संतोष तांबे, नांदेड ग्रामीणचे जगदीश भंडरवार, शहर वाहतूक शाखेचे संजय ननवरे, गुप्त वार्ताचे श्री कवितके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, एपीआय रवी वाव्हुळे, पांडुरंग माने यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी क्युआरटी पथक, आरसीपी बंदोबस्तात सहभागी झाले होते. पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून मोर्चामध्ये सहभाग नोंदविला होता. आंदोलकांच्या प्रत्येक हालचाली पोलिसांच्या ड्रोन कॅमेरा कैद करण्यात आल्या आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!